Subscribe Us

header ads

कान : ०. ०००१ सकेंन्डचे ध्वनी अंतराळ ओळखू शकतो

कान : ०. ०००१ सकेंन्डचे ध्वनी अंतराळ ओळखू शकतो   

एखाद्या स्त्रोतातून आलेला आवाज दोन्ही कानांमध्ये किती अंतरातून पोहोचत आहे याच्याच मदतीने आपण ध्वनिस्रोताचे अंतर व दिशेचा अंदाज घेत असतो . आपले कान 0 . 000१ सेकंदाचे ध्वनी अंतराळ ओळखू शकतात .

मानवी शरीराच्या कानाची रचना थोडक्यात खालीलप्रमाणे असते . बाह्यकर्णापासून सुरू होऊन मार्ग कानाच्या आतील मध्य कर्णातून कानाच्या पडद्याजवळ जातो . या पडद्याला टिम्पेनिक मेम्ब्रेन म्हणतात . आवाज ऐकण्यासाठी पडद्यात अत्यंत सूक्ष्म कंपनाची गरज असते . मध्य कर्णात पडद्याशिवाय दोन लहान स्नायू व मॅलियस , इनकस आणि स्टेपीज ही तीन सूक्ष्म हाडे असतात . एका छोट्या भुयाराने ज्याला यूस्टेकियन ट्यूब म्हणतात कान  आपल्या नाक व टाळूच्या मागच्या भागाला जोडलेला असतो . अंतर्गत कर्णाचे दोन भाग असतात . ज्यांना काम्लिया ओव्ह वेस्टिब्यूलर अपरेटस्  म्हणतात . 
कानाच्या पडद्यातून ध्वनिलहरी काम्लियापर्यंत पोहोचतात आणि याच्याशी निगडित मञ्जातंतू मेंदूला आवाज ऐकवू लागतात . एखादा ध्वनी मधुर आहे , कर्कश आहे , पुरुषी आहे की स्त्रीचा आहे इ . ची ओळख काम्प्लियाद्वारे होत असते . जेव्हा आपण गोल फे - या मारीत असतो तेव्हा आपल्यासोबत व्हॅस्टिब्यूलर अपरेटसुही शरीर व डोक्यासोबत फिरू लागते ; पण जेव्हा आपण अचानक थांबतो तेव्हा आपला हा अपरेटस् थांबत नाही . याचमुळे आपल्याला वाटते की पृथ्वी आपल्याभोवती फिरत आहे . 
ध्वनी दर सेकंदाला ३३५ मीटर गतीने जातात . ध्वनीची तीव्रता डेसीबलमध्ये मोजली जाते . माणूस दर सेकंदाला २० ते २0000 कंपने होणारा आवाज ओळखण्यात सक्षम आहे . काही इतर प्राण्यांची क्षमता खूप जास्त असते . उदा . डॉगी ३५000 , वटवाघूळ ७५000 व डॉल्फिन २० ते १५0000 कंपने दर सेकंदाला ऐकू शकतात , डॉल्फिनचे ऐकण्याचे हे काम बाहेरील कान नव्हे तर त्यांचा जबडा करीत असतो . ध्वनी दाब पातळीचे एक वैशिष्ट्य म्हणजे डेसीबलमध्ये थोडासाही बदल जास्त गंभीर प्रभाव निर्माण करतो . उदा . १२0 डेसिबलचा आवाज ८0 डेसीबल आवाजापेक्षा १00 पट अधिक तीव्र असतो . शास्त्रीय संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की , जर आपण ७५ डेसीबलपेक्षा मोठा आवाज आठ तासांपेक्षा जास्त वेळ दर तासाला ऐकला तर आपले कान बहिरे होऊ लागतात . ध्वनिप्रदूषणाने फक्त आपल्या कानांवरच नव्हे तर संपूर्ण शरीरावर दुष्परिणाम होत असतो .

 https://www.wisdom365.co.in/


Post a Comment

0 Comments