Subscribe Us

header ads

Interview कसा देणार

Interview कसा देणार

आपल्या आयुष्यात अनेकदा मोक्याच्या वेळी आवश्यक ते कौशल्य आपल्या अंगी नसल्याचे लक्षात येते आणि मग महत्त्वाची संधी गमवावी लागते . आयुष्याच्या विविध टप्प्यांवर असे अनुभव येतात . पण नोकरी मिळवताना असे अनुभव येतातच विशेषतः मुलाखतीच्या वेळी . मुलाखतीच्या वेळी आत्मविश्वासाने बोलता आले नाही तर अनेकदा गुणवत्ता असूनही उपयोग होत नाही .

स्पर्धा परीक्षेच्या बाबतही असे घडते .  रात्रंदिवस अभ्यास करून तरुण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतात आणि फक्त तोंडी परीक्षेत बोलता  न आल्यामुळे अपयशी होतात , तेव्हा किती वाईट वाटते हे वेगळे सांगण्याची गरज नाही .

नोकरीच्या ठिकाणी एखादा कौशल्यवान , - कष्टाळू व्यक्ती आपली गुणवत्ता बोलण्याच्या माध्यमातून वरिष्ठांपर्यंत व्यक्त करू शकत नसेल तर मर्यादित वेतन आणि ठरावीक पदापुरताच राहून जातो .  सर्वसाधारणपणे बोलता न येण्याची  काही प्रमुख कारणे आत्मविश्वासाचा अभाव , स्वत : ला कमी लेखणं , ज्या विषयावर बोलायचंय त्याचा अपूर्ण अभ्यास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत : सोबत चालणारा अत्यंत नकारात्मक , पराभूत स्वसंवाद आणि  त्यामुळे निर्माण होणारी काल्पनिक भीती  अशी आहेत .

आपल्याला बोलतं व्हायचय हे एकदा पक्क ठरवणं फार महत्त्वाचं आहे .  ज्याच्याशी किंवा ज्यांच्यासमोर बोलणार आहोत ती आपल्यासारखीच माणसं आहेत ,  बोलणं म्हणजे आपल्याला जे माहीत आहे ते दुस - याला सांगणं , शक्यतो मुद्देसूद सांगणं  यासारखे विचार आत्मसात करावे लागतील .

संवादाचा दोन्ही स्तरांवर सराव करावा  लागेल . मानसिक स्तरावर यशस्वी संवादाचा  सराव , इतरांशी कसं बोलायला पाहिजे याची कल्पनाचित्र निर्माण करून त्याची उजळणी करावी लागेल .


प्रत्यक्षात अनेक व्यक्तींसोबत बोलत राहाणे , विविध क्षेत्रातील व्यक्तींसोबत ' बोलण्याने , त्यांचे ऐकल्याने तुमची भीड चेपेल . वाचन वाढवावे लागेल . पुरेशा तयारीच्या अभावाने बोलणे खुटते किंवा काय बोलावे हे सुचत नाही .
जेव्हा आपण ज्ञान पचवायला शिकतो , ओठावर खेळवायला शिकतो तेव्हाच वाणीला परिणामकारकता लाभते . 
मुळात आपल्याला जे बोलायचंय ते स्वत : ला नीट समजलेल व पटलेल असेल , ' तर काय बोलायचं हे शोधत बसावं लागत नाही . त्यासाठी चौफेर वाचन , मुद्देसूद लिखाण खूप उपयोगी पडेल . उपाय खूप सोपे आहेत . फक्त बोलतं होण्याचा निर्णय मात्र स्वतःला घ्यावा लागणार आहे . हा निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच कळून चुकेल की संवाद साधणं किती आनंददायी आहे आणि तुम्ही किती सहज लोकप्रिय झालेले आहात .

बोलताना येण्यासाठी आपली विचारप्रक्रिया सतत कार्यान्वित असायला हवी . तर्कसंगत विचार - ही कला असते आणि ती वाचन व लेखन आणि नंतर अनुभवाने समृद्ध होत जाते .

Post a Comment

6 Comments

  1. https://wisdom365.co.in/fengshui-tips-hindi-this-measure-of-feng-shui-never-leaves-money-at-home/

    ReplyDelete
  2. फेंगशुई के इस उपाय से कभी नहीं रहती घर पर पैसों की कमी

    ReplyDelete
  3. http://wisdom365.co.in/spiritual-in-marathi-now-you-cannot-moralize-someone-with-fear/

    ReplyDelete
  4. Whatsapp status in Marathi
    https://wisdom365.co.in/wisdom-marathi-whatsapp-status-in-marathi/

    ReplyDelete
  5. http://wisdom365.co.in/wisdom-amazing-fact-about-pyramid-in-hindi/

    ReplyDelete
  6. Hello aapke pass privacy policy and disclaimer page nahi hai aap page creat kijiy

    ReplyDelete