दुःखातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग
Marathi Story for Kids
बालकथा
एकदा एक तरुण एका साधूजवळ गेला . गुरुदेव मी माझ्या आयुष्यात खूप दुःखी आहे . कृपया या दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा . साधू म्हणाले , पाण्याच्या पेल्यात एक मूठ मीठ घाल व ते प्राशन कर . त्या तरुणाने तसेच केले .
साधूनी विचारले याचा स्वाद कसा वाटला. खूप खराब , खूप खारट, तरुण थुकता थुकता सांगू लागला . साधू हसत हसत म्हणाले , आता एकदा पुन्हा आपल्या मुठीत मीठ घे आणि माझ्या मागे ये.
दोघेही हळूहळू पुढे जाऊ लागले व एका स्वच्छ पाण्याच्या तळ्याजवळ येऊन थांबले . साधू त्या तरुणाला म्हणाले , चल आता ते मीठ या पाण्यात टाक. त्याने तसेच केले. आता या तळ्याच. पाणी पी. ते पाणी प्यायल्यावर साधूनी त्याला विचारले आता सांग याचा स्वाद कसा वाटला . आतासुद्धा तुला ते खारट वाटलं. तरुण म्हणाला नाही. हे तर गोड आहे . खूच छान आहे.
साधू तरुणाच्या शेजारी बसले व त्याचा हात पकडून म्हणाले, जीवनातील दु : ख अगदी मिठासारखे आहे . ना कमी ना जास्त. जीवनातील द:खाची मात्रा तेवढीच असते; परंतु आपण किती दुःखाचा स्वाद घेतो, हे यावर अवलंबून असते की आपण ते कोणत्या पात्रात टाकत आहोत . म्हणून जेव्हा तुम्ही दुःखी व्हाल तेव्हा फक्त एवढंच करा की, स्वत : ला तळ्याएवढं मोठं करा. पेला बनू नका . दुःख जीवनात असणार , जोपर्यंत जीवन आहे.
Read more अल्बर्ट आईन्स्टाईनची गोष्ट
0 Comments