Subscribe Us

header ads

मिकू माकडाने सांगितले दुनियादारीचे रहस्य

मिकू माकडाने सांगितले दुनियादारीचे रहस्य

Bodh Katha in Marathi

Bodh Katha in Marathi

बोधकथा
टोनू घोडा आणि घोनू गाढव यांनी शेजारीशेजारीच किराणा मालाचे दुकान उघडले . हळूहळू टोनू घोड्याचे दुकान चांगलेच चालू लागले ;
पण घोनू गाढवाचे दुकान ठप्प पडले . यामुळे घोनू गाढवाला खूपच वाईट वाटू लागले . तो दु : खी राहू लागला . एकदा घोनू गाढव त्याच्या मिकू माकड या मित्राला भेटायला गेला .
तो त्याला म्हणाला , ' मित्रा , माझे दुकान चालत नाही याचे कारण तूच सांग . वास्तविक माझ्या दुकानातील वस्तुंचे भावही टोनू घोड्याच्या दुकानातील वस्तुएवढेच आहेत .
मी मालही अगदी व्यवस्थित मापून देत असतो . ते ऐकून मिकू विचारात पडला . खूप विचार केल्यानंतर तो घोनू गाढवाला म्हणाला , ' घोनू दादा , मी तुझ्या दुकानात बसूनच तुझे दुकान का चालत नाही याचा शोध घेईन .
सांगितल्याप्रमाणे मिकू माकड दसऱ्या दिवशी सकाळीच घोनू गाढवाच्या दुकानात येऊन बसले . ते दिवसभर घोनू गाढवाच्या हालचाली पाहात होते . वरचेवर बाहेर जाऊन टोनू घोड्याच्या दुकानातही पाहात होते .
संध्याकाळ झाल्यानंतर तो घोनू गाढवाला म्हणाला , ' आता मी जातो . उद्या पुन्हा येईन .
' दुसऱ्या दिवशी सकाळी मिकू दुकानात आला . येताच घोनूला म्हणाला , ' यार घोनू , खूप भूक लागली आहे रे .
हरी पोपटाकडून चार सामोसे तरी आण . पण हो . सामोसे हरी पोपटाकडूनच आण . इतर कोणाकडून नको . ' घोनू सामोसे आणायला गेला . थोड्या वेळाने तो सामोसे घेऊन आला . दोघे सामोसे खाऊ लागले .
मिकूने सामोशाची चव घेतली आणि तो म्हणाला , “ सोनू , तू सामोसे हरी पोपटाकडून आणले नाहीस . दुसरीकडूनच कोठून तरी आणले आहेस . ' घोनू म्हणाला , ' खरं आहे तुझं . मी सामोसे हरीकडून आणले नाहीत तर काळू उंदराकडून आणले .
कारण हरी पोपट त्याच्या दुकानातच नव्हता . तो शेजारच्या दुकानात बसून गप्पा मारीत होता व मी तो परत येईपर्यंत वाट पाहू शकत नव्हतो . ते ऐकून मिकू म्हणाला , ' हीच गोष्ट तर मी तुला समजावण्याचा प्रयत्न करीत होतो .

अरे बाबा , तुही जेव्हा पाहावे तेव्हा शेजारपाजारच्या दुकानांत जाऊन गप्पा मारत असतो . अशावेळी ग्राहक तुझी कितीवेळ वाट पाहील . तेही तुझ्याप्रमाणेच शेजारच्या दुकानात जाऊन त्याला हवी ती वस्तू घेईल .
' माझ्या मित्रा , मला तुला हेच सांगायचे आहे की , तुझ्या दुकानात ग्राहक येवो वा न येवो तू दकानात बसून राहा . आज ना उद्या तुझ्या दुकानातही टोनूच्या दुकानासारखीच गर्दी होईल .

More Bodh Katha Moral Stories in Marathi



Post a Comment

0 Comments