Subscribe Us

header ads

जेफ बेझोस यांच्या बैठकीत पॉवरपॉईंटवर बंदी

जेफ बेझोस यांच्या बैठकीत पॉवरपॉईंटवर बंदी 
 https://www.wisdom365.co.in/

जेव्हा जेफ बेझोस कार्यालयीन कामगिरीत सुधारणा होण्यासाठीच्या टिप्स देत असतात तेव्हा तुम्ही फक्त बसून ऐकायचे असते . कारण ते अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत . २०१८ मध्ये त्यांनी कंपनीच्या कर्मचा - यांना आणि भागधारकांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात , अॅमेझॉनमध्ये होणा - या बैठकांमध्ये पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनवर बंदी घालण्यात आली आहे . 
त्याबदल्यात त्यांनी जी पद्धत रूढ केली आहे ती स्वत : चा बिझनेस चालवणान्यांसाठी अमूल्य असा धडा आहे . ते म्हणतात , आमच्याकडे पॉवर पॉईंट किंवा अन्य स्लाइड शोसारखी प्रेझेंटेशन सादर केली जात नाहीत . त्याऐवजी आम्ही व्यवस्थित रचना केलेला सहा पानी मेमो लिहून काढतो . कुठल्याही मीटिंगची सुरूवात करण्यापूर्वी पहिली तीस मिनिटे असा मेमो तयार करण्यात येतो . या मेमोची व्यवस्थित रचना केलेली असते आणि ते सहा पानी असतात . वर्णनात्मक असतो . त्यात कुठेही बुलेट पॉईंट नसतात . फक्त परिच्छेद असतात . पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनपेक्षा या पद्धतीत काही फायदे असल्याचे बेझोस यांचे म्हणणे आहे .
Kon Se चिन्ह बनायगे Aap Ko मालामाल
 https://www.wisdom365.co.in/

Post a Comment

0 Comments