Subscribe Us

header ads

नवीन पुणेरी पाटी 🤣

नवीन पुणेरी पाटी 

आमच्या बागेतील नारळ आपल्या गाडीवर पडून काच फुटल्यास . . . आधी नारळ कम्पाउंडवरुन परत बागेत टाकावा ! आणि नंतर निर्लज्जपणे तक्रार करायला आत येऊ नये , आपली गाडी आपण आमच्या झाडाखाली आपणहून लावलेली होती . . आम्ही आमचे झाड आपल्या गाडीच्या वर आणून लावलेले नव्हते ! धन्यवाद . . . सूचना संपूर्ण 

सेल्फी 

अर्ध्या तासापासून बायको मोबाईल कॅमे - याला रुमालाने साफ करत होती . सेल्फी काढायची आणि डिलीट करायची . बाजूला नवरा लॅपटॉपवर काम करत होता . शेवटी त्याला राहवलं नाही आणि बोलला . . . जरा रुमाल चेयावर फिरवून ट्राय कर ! लॅपटॉप फुटला


पप्पा : पप्पू , तू असं काही काम कर की तुझे नाव पृथ्वीच्या कानाकोप - यात पोहोचेल . 
पप्पू : कसं शक्य आहे ते ? गोल असलेल्या पृथ्वीला कानाकोपरे कसे असतील ?  🤣

ग्राहक : वा , तुमच्याकडील जेवण तर खूपच चविष्ट आहे । रे ? मला इथे पूर्वीच यायला हवे होते ? 
वेटर : हो साहेब , जर तुम्ही दहा दिवसांपूर्वी आला असता तर हेच जेवण तुम्हाला ताजे मिळाले असते . 🤣

सतीश : जगातील सारे मूर्ख मेले तर काय होईल रे ? 
महेश : मला कळत नाही की , तुला मरायची एवढी काय घाई झाली आहे .  🤣

रमेश : माणसाच्या डोक्यावरचे केस पांढरे होऊ नयेत यासाठी एखादा उपाय सांग रे , 
मदन : हो , हो , आहे ना उपाय . सोपं आहे . त्याने टक्कल करून घ्यावं .  🤣

राकेश : मी बसच्या मागे धावून चक्क वीस रुपये वाचवले . 
सरेश : निव्वळ मूर्ख आहेस तू ? तुला धावायचंच होत तर किमान टॅक्सीच्या मागे तरी धावायचंस , जास्त पैसे वाचले नसते का ? 🤣

 https://www.wisdom365.co.in/




Post a Comment

0 Comments