Ekka Rajachi Gosht
Ekka Rajachi Gosht
Bodh Katha in Marathi
बोधकथा असे म्हणतात की , मगधचा सम्राट बिबिसार याच्या राजधानीत एकदा विचित्र घटना घडू लागल्या . रोज कोणत्या ना कोणत्या घरात आग लागू लागली होती . यामुळे सारे शहरवासी त्रस्त होते . एके दिवशी ते सारे एकत्र जमून सम्राट बिंबिसारांकडे गेल व त्यांना सारी हकीकत सांगितली .
जनतेचा त्रास पाहन सम्राटांनी काही मार्ग शोधण्याचा विचार केला . ते शहरवासीयांना म्हणाले , ' जर आपल्यापैकी प्रत्येकाने आपापल्या घराचे रक्षण केले तर आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवता येऊ शकेल . ' त्यासोबतच सम्राटांनी अशी घोषणाही केली की , ज्यांच्या घरात आग लागेल त्यांना शहराबाहेर असलेल्या जंगलात राहावे लागेल .
योगायोगाने एक दिवस नेमकी राजवाड्यालाच आग लागली . सम्राट त्याचवेळी राजवाडा सोडून जंगलाकडे
जाऊ लागला . साऱ्या दरबाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला , पण सम्राटांनी कोणाचेच ऐकले नाही . ते म्हणाले , ' माझा आदेश कुशागपुरातील प्रत्येक रहिवाशासाठी होता व तो माझ्यावरही लागू होतो .
जाऊ लागला . साऱ्या दरबाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला , पण सम्राटांनी कोणाचेच ऐकले नाही . ते म्हणाले , ' माझा आदेश कुशागपुरातील प्रत्येक रहिवाशासाठी होता व तो माझ्यावरही लागू होतो .
मी माझ्या आदेशाचे उल्लंघन करू शकत नाही . जर मी असे केले तर जनतेला काय उत्तर देऊ शकेल . सम्राट जंगलात राह लागले . त्यांची शिस्तप्रियता व न्यायनिष्ठूरता पाहून प्रजेच्या मनातील त्यांचा आदर अधिकच वाढला . हळूहळू सर्वच शहरवासीयांची घरे जळून खाक झाली व ते जंगलात येऊन राह लागले . असे म्हणतात की , त्याच जंगलात मगधची नवी राजधानी तयार झाली . जी राजगृह नावाने प्रसिद्ध झाली .
More Bodh Katha Moral Stories in Marathi
1 Comments
Very nice
ReplyDelete